Animal husbandry : घरात गाय म्हैस असेल तर मिळवा 80 हजार रुपये अनुदान

Animal husbandry घरात गाय म्हैस असेल तर मिळवा 80 हजार रुपये अनुदान

 

घरात गाय म्हैस असेल तर मिळवा 80 हजार रुपये अनुदान

Animal husbandry राज्यात दूध उत्पादक वाढीस चालना देण्यासाठी दुधाळ जनावरे गट वाटपाच्या राज्यस्तरीय तसेच जिल्हा वार्षिक योजनेतील प्रति दुधाळ गाई साठी 70 हजार रुपये व म्हशीसाठी 80 हजार रुपये इतके अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे या सुधारित किमतीनुसार योजनेची अंमलबजावणी आर्थिक वर्ष एप्रिल २०२३ – २४ पासून सुरू झाली आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Animal husbandry  राज्यातील ग्रामीण भागात दुग्धउत्पादनास चालना देण्यासाठी नावीन्यपूर्ण सर्वसाधारण अनुसूचित जाती उपयोजना आणि जिल्हास्तरीय आदिवासी क्षेत्र उपयोजना योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 2 दुधाळ देशी 2 संकरित गाई 2 म्हशीचा एक गट वाटप करणे या योजनेत शासनाची मंजुरी देण्यात येत आहे सदरची योजना राज्यात 2023 24 पासून राबविण्यात यावी. योजनेच्या आर्थिक निकष:-या योजनेअंतर्गत निवड झालेल्या सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यास 2 देशी द2 संकरित व 2 म्हशीचा एक गट 50 टक्के अनुदानावर तर अनुसूचित जाती उपयोजना आदिवासी क्षेत्र उपयोजनांतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना 75 टक्के वाटप करण्यात यावा.

या योजनेअंतर्गत निवड झालेल्या दुधाळ जनावर साठी गोठा बांधकाम कुट्टीमशीन यंत्राचा व खाद्य साठवणूक शेड बांधकाम यासाठी कोणतेही अनुदान दिले जाणार नाही.

सर्वसाधारण  योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना शासकीय अनुदान व्यतिरिक्त उर्वरित 50 टक्के रक्कम तसेच अनुसूचित जाती/आदिवासी क्षेत्र उपयोजना अंतर्गत लाभार्थ्यांना देय शासकीय अनुदाना व्यतिरिक्त 25% उर्वरित रक्कम स्वतः किंवा बँकेकडून कर्ज घेऊन विकावी लागेल.

Animal husbandry   लाभार्थी निवडीचे निकष:-

सर्वसाधारण प्रवर्गातील तसेच अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्याची निवड खालील घटकांवरून प्राधान्यक्रमाने करण्यात यावी.

  1. महिला बचत गट लाभार्थी
  2. अल्पभूधारक शेतकरी (एक ते दोन हेक्टर भूधारक)
  3. सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नाव असलेले)

एका कुटुंबातील एकाच व्यक्तीच्या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला पुन्हा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

या योजनेमध्ये प्रतिदिन दहा ते बारा लिटर दूध उत्पादन देणाऱ्या एच एफ जर्सी संकरित गाई, प्रतिदिन आठ ते दहा लिटर उत्पादन देणाऱ्या गीर ,साहिवाल ,रेड सिंधी, राठी, थारपारकर, प्रतिदिन पाच ते सात लिटर दूध देणाऱ्या देवणी ,लाल कंधारी, गवळाऊ व डांगी गाई तसेच मुर्रा व जाफराबादी आशा सुधारित जातीच्या म्हशी वाटप करण्यात येणार आहे वाटप करावयाची दुधा जनावरे एक ते दोन महिन्यापूर्वी व दुसऱ्या तिसऱ्या वेताला असावीत. Animal husbandry

 

Pik Vima Update 2023: मार्च मध्ये झालेल्या अवकाळी पावसाचे शेतकर्यांना मिळणार हेक्टरी १३ हजार रुपये एवढे अनुदान

Animal husbandry
Animal husbandry

Leave a Comment

Close Visit Mhshetkari