Big News : कृषीमंत्री होताच धनंजय मुंडेंचा मोठा निर्णय !
सरकारचा मोठा निर्णय ६० वर्षा नंतर मिळणार पेन्शन,इथे बघा किती मिळणार पेन्शन
Big News : शेतकऱ्यांची शेतीसाठी बियाणे खरेदी करताना मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते. यामुळेच आता राज्यात बियाणांच्या खरेदीबाबत कायदा लागू करण्यात येणार आहे. यानंतर आता पुन्हा एकदा याबाबत राज्याचे नवे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. तसेच शेतकऱ्यांची होणार फसवणूक टळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करताना झालेल्या फसवणुकीच्या तक्रारीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. चला तर मग काय निर्णय घेण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
तक्रारीसाठी थेट व्हॉट्सॲप क्रमांक :-
Big News तर शेतकरी मित्रांनो बियाणे, खते, कीटकनाशके याबाबत शेतकऱ्यांना नेहमीच अडचणीचा सामना करावा लागतो. त्याचवेळी याबाबत नक्की तक्रार कुठे करायच? असा प्रश्न शेतकऱ्यांना वेळोवेळी पडलेला असतो. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता खते, बियाणे अथवा किटकनाशके यासंदर्भात तक्रार करण्यासाठी शेतकऱ्यांना राज्य सरकारमार्फत लवकरच व्हॉट्सॲप क्रमांक जारी करण्यात येणार आहे. याबाबतचे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. Big News