Crop insurance update :- उर्वरित अनुदान व कर्जमाफी 15 ऑगस्ट पूर्वी मिळणार

Crop insurance update :- उर्वरित अनुदान व कर्जमाफी 15 ऑगस्ट पूर्वी मिळणार

Crop insurance update त्या आधी थोडं महत्त्वाचं वाचा.

 

Crop insurance update

Crop insurance update :- नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणारे अनुदान आणि कर्जमाफीची उर्वरित रक्कम 15 ऑगस्ट पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत दिली. सत्ताधारी आणि विरोधकांनी निियम 260 अन्वेय मांडलेल्याया प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना कृषी योजनेचा आढावा घेतला.

 

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

दोन दिवस चाललेल्या या चर्चेत विरोधी आणि सत्ताधारी सदस्यांनी सहभाग घेतला. महादेव जानकर, प्रज्ञा सातव, राम शिंदे यांच्यासह अनेक सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला दरम्यान सकाळी साडेनऊला चर्चेला प्रारंभ झाल्यानंतर कृषिमंत्री धनंजय मुंडे सभागृहात उपस्थित नसल्याने त्यावर सुरेश धस यांनी आक्षेप घेतला ही केवायसी होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडलेली आहे.

तसेच नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न तातडीने सोडला पाहिजे अशी मागणी सदस्यांनी केली. यावर 15 ऑगस्ट पर्यंत हे प्रश्न मार्गी लावू अनुदान व कर्ज वाटप केले जाईल असे आश्वासन दिले.

ग्रामीण भागातील शेतीला समृद्धी देण्याच्या व्यापक उद्देशाने तयार करण्यात आलेली पोखरा योजना अत्यंत फायदेशीर असून ती केवळ गावापूर्ती ती मर्यादित न ठेवता प्रत्येक गावात लागू व्हावी यासाठी पोखराचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येत आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत या योजनेची व्याप्ती पोहोचावी असा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे असेही कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले राज्यात या खरीप हंगामात पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत तब्बल 1 कोटी 11 लाख शेतकऱ्यांनी पिक विमा भरला असून ही संख्या दररोज 6 ते 7 लाखाने वाढत आहे. असेही कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले. Crop insurance update

 

 

Leave a Comment

Close Visit Mhshetkari