Desi jugaad Car :- भंगार पत्र्यापासून तयार केली कार, या जुगाडू गाडीच्या वेगासमोर महागड्या कार सुद्धा होतील फेल दोन दिवस झाले ही कार सोशल मीडियावर घालीत आहे धुमाकूळ..!
जुगाड करण्याच्या बाबतीत भारतीयांचा हात कोणीच धरू शकत नाही. कारण भारतीय लोक टाकावू वस्तूंपासून अशा अशा वस्तू तयार करून दाखवतात की ज्या पाहून खरंच थक्क व्हायला होतं.
असाच एक अतरंगी जुगाड सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. काही तरुणांनी चक्क लाडूक, पत्र्याचे डबे, आणि चुन्यापासून एक गाडी तयार केली.
अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या गाडीला त्यांनी बाईकचं इंजिन लावलेय. या गाडीत एक दोन नव्हे तर तब्बल ७ जण प्रवास करू शकतात. या देसी कारचा वेग पाहून खरंच तुम्ही सुद्धा अवाक् व्हाल.
या गाडीचा लूक एखाद्या विंटेज कारसारखा दिसतोय. ७०-८० च्या दशकात जेव्हा मोटार गाड्या रस्त्यावर धावू लागल्या तेव्हा त्या साधारण अशाच दिसायच्या. ही गाडी जुन्या बाईकची चाकं आणि बाईकचं इंजिन लावण्यात आलं आहे.
शिवाय गाडीची बॉडी तयार करण्यासाठी चुना, जुना लोखंडी पत्रा आणि लाकडाचा वापर करण्यात आला आहे. आश्चायाची बाब म्हणजे या गाडीला पाव्हर स्टेअरिंग करून ती १ लीटर पेट्रोलमध्ये तब्बल ३० ते ३५ कि.मी पळते.
या गाडीच्या पुढच्या बाजूस CSK कार असं पोस्टर लावण्यात आलं आहे. त्यामुळे या जुगाडू गाडीला CSK कार असंच म्हटलं जातेय. व्हिडीओ पाहून असं वाटतंय की हा तरुण गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेतोय की काय? या गाडीवर चेन्नई सुपरकिंग्सची पेटिंग करण्यात आली आहे.
त्यामुळे ही गाडी आणखी आकर्षक वाटतेय. तुम्हाला ही देसी जुगाड पासून तयार करण्यात आलेली गाडी कशी वाटली?