Kanda Chal Anudan:कांदा चाळ अनुदान : ‘या’ 20 जिल्ह्यात 5 हजार 714 कांदा चाळीस मिळणार अनुदान, तुमच्या जिल्ह्यात किती चाळीला मिळणार सबसिडी ? वाचा….

कांदा चाळ अनुदान : ‘या’ 20 जिल्ह्यात 5 हजार 714 कांदा चाळीस मिळणार अनुदान, तुमच्या जिल्ह्यात किती चाळीला मिळणार सबसिडी ? वाचा….Kanda Chal Anudan

Kanda Chal Anudan : शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर राज्यात विविध पिकांचे उत्पादन घेतले जाते. यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. या पिकाला नगदी पिकाचा दर्जा प्राप्त आहे. मात्र याच्या बाजारभावात कायमच लहरीपणा पाहायला मिळतो. अनेकदा बाजारात कांद्याला खूपच कवडीमोल दर मिळतो.

अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांकडे कांदा साठवण्यासाठी पर्याप्त सुविधा असतील तर शेतकरी बांधव ज्या कालावधीमध्ये बाजारात मालाला चांगला भाव मिळत नाही त्या कालावधीत मालाची साठवणूक करू शकतात आणि जेव्हा चांगला दर मिळेल तेव्हा त्याची विक्री करू शकतात. कांदा साठवणूक करण्यासाठी मात्र आधुनिक चाळीची आवश्यकता असते.

शेतकरीपुत्रांना मोठी संधी! दररोज 1 हजार रुपये कमवा, कृषी क्षेत्रातील नामांकित कंपनीसोबत डीलरशिप करा

ही चाळ उभारण्यासाठी मात्र शेतकऱ्यांकडे पुरेसे भांडवल राहत नाही. परिणामी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. दरम्यान शेतकऱ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी चाळ तयार करण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जात आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून यावर्षी देखील कांदा चाळ उभारण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. यासाठी 51 कोटी रुपयांच्या निधीला शासनाने मान्यता दिली आहे.

या मंजूर झालेल्या निधीतून आता राज्यातील 20 कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये चाळ उभारणीसाठी अनुदान दिले जाणार आहे. नासिक, अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना यांसारख्या प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये चाळी उभारण्याचे उद्दिष्टे अधिक आहे.

किरीट सोमय्या यांच्या व्हिडिओ चॅट मधील महिला कोण ?

पहा फडवणीस काय म्हणतात….

 

दरम्यान आज आपण राज्यातील कोणत्या जिल्ह्यात किती कांदा चाळ उभारण्याचे उद्दिष्टे शासनाने दिले आहे याबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

किती अनुदान मिळणार?

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून कांदा चाळ बनवण्यासाठी अनुदान पुरवले जाणार आहे. यात 25 टन साठवण क्षमता असलेल्या चाळीस 87 हजार पाचशे रुपये अनुदान दिले जाणार आहे. दरम्यान शासनाकडून दिले जाणारे हे अनुदान खूपच तोकडे असून यामध्ये भरीव वाढ करण्याची मागणी केली जात आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती कांदा चाळ बनवण्याचे उद्दिष्ट आहे?

नाशिक – ५२५
धुळे – ३८०
नंदुरबार – १९२
जळगाव -१९०
पुणे – २७५
नगर – ५९०
सोलापूर – २८६
छत्रपती संभाजीनगर – ५९५
जालना – ४४०
बीड – ४४३
लातूर – २८८
नांदेड – १३२
परभणी – ३४०
हिंगोली – ६३
धाराशीव – ३३५
अमरावती – ८२
अकोला – ११८
वाशीम – ११८
यवतमाळ – ९२
बुलडाणा – १९०

Leave a Comment

Close Visit Mhshetkari