Land Record : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता शेतजमीन मोजणी ऑनलाईन होणार !

Land Record : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता शेतजमीन मोजणी ऑनलाईन होणार !

Land Record : १ ऑगस्टपासून जमीन नोंदणीसाठी अर्ज करण्यासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही. शेतजमीन मोजणीचे काम ऑनलाइन होणार असल्याची माहिती राहाता भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक योगेश थोरात यांनी दिली आहे.

शेतकर्‍यांना त्यांच्या शेतजमिनीची मोजणी करून घेण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागत होत्या. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ही सर्व प्रक्रिया आता ऑनलाइन राबविण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी जून, जुलै झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर “या” जिल्ह्यांना वाटप सुरू..

 

यासाठी शेतकऱ्यांना यापुढे भूमी अभिलेख कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही आणि मोजणीसाठी सहा महिने वाट पाहण्याची गरज भासणार नाही. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचे अचूक नकाशे सहज मिळण्यास मदत होईल.

आता शेतकर्‍यांना त्यांच्या शेतजमिनीची मोजणी करायची असेल तर त्या शेतकर्‍यांना कार्यालयात न येता ऑनलाईन अर्ज भरावा लागेल आणि ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर शेतकर्‍यांना बँकेत न जाता ऑनलाईन जमिनीच्या मोजणीचे पैसे भरता येतील. शेतकर्‍यांना त्यांच्या शेताच्या मोजणीची तारीख मोबाईल संदेशाद्वारे तत्काळ मोबाईल फोनवर कळविण्यात येईल आणि पुढील १५ दिवसात सदर जमिनीची मोजणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकर्‍यांना शेततळे मोजण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. कार्यालयात न येता त्यांच्या शेतजमिनीचा अचूक नकाशा ऑनलाईन डाउनलोड करा.

2000 हजार रुपये बँक खात्यात आले नाही तात्काळ येथे कॉल करा

उपग्रहाद्वारे नकाशातील क्यूआर कोडच्या मदतीने अक्षांश आणि रेखांश उपलब्ध करून दिले जातील. महसूल मंत्र्यांच्या सूचनेनुसार कार्यालयात ५० नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली असून मोजणीसाठी खासगी कंपनीची मदत घेऊन कमीत कमी वेळेत अचूक मोजणी करण्यावर भर देण्यात येत आहे. शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची मोजणीसाठी होणारी ससेहोलपट थांबणार असून

Leave a Comment

Close Visit Mhshetkari