Land Record: 7/12, 8अ, फेरफार उतारा व मिळकत पत्रिका आता एका क्लिकवर

Land Record: जमिनीसाठी लागणारा सातबारा Land Record उतारा आठ अ उतारा, फेरफार उतारा व मिळकत पत्रिका आता एका क्लिकवर ऑनलाईन मिळणार आहेत. ऑनलाइन शुल्क भरल्यानंतर ग्रामीण भागांमधील शेतकऱ्यांचा जाणारा वेळ आणि पैसा हा देखील वाचणार आहे. आवश्यक पैसे भरल्यानंतर एक एक मध्ये वरील कागदपत्रे मिळत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळाला आहे.

Land Record या सुविधा मिळणार

  • डिजिटल सातबारा 7/12 digital
  • आठ अ उतारा
  • फेरफार उतारा
  • मिळकत पत्रिका

land record maharashtra वरील सर्व कागदपत्रे आता एक क्लिक मध्ये आपल्या मोबाईलवर सहजरित्या घरबसल्या आपण काढू शकता.

किती रक्कम लागणार?

सातबारा उतारा 8अ उतारा फेरफार उतारा मिळकत पत्रिका वरील डॉक्युमेंट काढण्यासाठी वेगवेगळे शुल्क आकारले जात आहेत परंतु आता आपले सरकार या संकेतस्थळावर किंवा माहा ई सेवा केंद्रावर ऑनलाईन उतारे 15 रुपये शुल्क भरून कागदपत्र आपण घरबसल्या आपल्या मोबाईलवरून काढू शकता.

कोठे लॉगिन करून काढावेत उतारे

वरील सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्र काढण्यासाठी आपल्याला https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/DSLR या संकेतस्थळावर जाऊन त्या ठिकाणी आपला मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी ने आपण लॉगिन करून सर्व कागदपत्रे काढू शकतात.

कोणती कागदपत्रे कशासाठी महत्त्वाची

सातबारा (७/१२): सर्व शेतकऱ्यांना सातबारा हा खूप महत्त्वाचा आहे आपल्या जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी सातबारा उतारा सर्वांनाच आवश्यक असतो. 7/12 online maharashtra

८अ उतारा: 8अ उतारा देखील जमिनीवरील मालक हक्क सिद्ध करण्यासाठी तसेच एका व्यक्तीची किती ठिकाणी जमीन आहे याची माहिती ८अ उताऱ्यावरून सहज मिळते.

फेरफार उतार: जमीन विकल्यानंतर हक्क विक्रीकरणाचा रद्द होतो आणि जमीन घेणारा मालक होतो. त्यानंतर त्याचे नाव सातबारा वर येते त्यासाठी फेरफार उतारा खूप महत्त्वाचा आहे.

मिळकत पत्रिका: मिळकत पत्रिका म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड हे मालमत्ता हक्क सिद्ध करण्यासाठी एक महत्त्वाचा पुरावा असून, प्रॉपर्टी किती हे प्रॉपर्टी कार्ड मधून म्हणजेच मिळकत पत्रिका मधून समजते.

Land Record आता ऑनलाईनचा काळ आहे सर्वसामान्य व खेडेगावांमध्ये सर्व डिजिटल सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासन नेहमीच विविध ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देत आहे. या सर्व सुविधेचा लाभ सर्वसामान्य नागरिकांनी घ्यावा यासाठी शासन नेहमीच तत्पर असते. त्या सुविचा लाभ अनेकांना होत असून त्यांचा पैसा व वेळ या सुविधामार्फत वाचत आहे. ज्या सुविधा तहसीलमार्फत मिळतात त्याच सुविधा आता आपल्या मोबाईलच्या मार्फत मध्ये मिळत आहेत.

वरील कागदपत्रे काढण्यासाठी येथे क्लिक

1 thought on “Land Record: 7/12, 8अ, फेरफार उतारा व मिळकत पत्रिका आता एका क्लिकवर”

Leave a Comment

Close Visit Mhshetkari