Maharashtra Onion Rate : अखेर कांद्याचा बाजारभाव तीन हजारांवर पोहोचला! राज्यातील ‘या’ बाजारात कांद्याला 3100 रुपये भाव, पहा सविस्तर

Maharashtra Onion Rate : अखेर कांद्याचा बाजारभाव तीन हजारांवर पोहोचला! राज्यातील ‘या’ बाजारात कांद्याला 3100 रुपये भाव, पहा सविस्तर

Maharashtra Onion Rate : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी येत आहे. किंबहुना गेल्या काही दिवसांपासून मिरची टोमॅटोसह सर्वच भाज्यांचे भाव वाढले आहेत.

त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शेतीमाल कवडीमोल भावाने विकला जात असल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे कांद्याच्या बाजारभावातही विक्रमी वाढ झाली आहे.

जानेवारी महिन्याच्या अखेरीपासून ते जून महिन्यापर्यंत, म्हणजे सुमारे पाच ते सहा महिन्यांच्या कालावधीत कांद्याची प्रति क्विंटल २०० ते ३०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाली.

पंजाबराव डख म्हणाले, राज्यात येत्या 24 तासात पडणार या जिल्ह्यात धो धो पाऊस.

Maharashtra Onion Rateपरिणामी शेतकऱ्यांना पिकासाठी लागणारा उत्पादन खर्चही वसूल करता आला नाही. अनेकांना कांद्याची वाहतूक करण्यासाठी झालेला खर्चही मिळाला नाही. मात्र आता परिस्थिती बदलली असून जुलै महिन्यात कांद्याच्या भावात चांगलीच वाढ होताना दिसत आहे.

आज कांद्याच्या बाजारभावाने तीन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण असून भावातील ही वाढ पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

कोणत्या बाजाराला सर्वाधिक दर मिळाला?

अमरावती फळे आणि भाजीपाला मार्केट: या बाजारात कांद्याला सर्वाधिक भाव मिळतो. या बाजारात आज 258 क्विंटल कांद्याची आवक झाली. आजच्या लिलावात या बाजारात किमान 900 रुपये प्रतिक्विंटल, कमाल 3 हजार 100 रुपये प्रतिक्विंटल आणि सरासरी 2 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर नमूद करण्यात आला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती : आज नागपूर एपीएमसीमध्ये पांढऱ्या कांद्याला कमाल २६०० रुपये प्रतिक्विंटल तर सरासरी २४५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

मुलीच्या भविष्यासाठी मिळणार 75 लाख रुपये नियम व अटी पहा

 

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज 22000 क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. आजच्या लिलावात या बाजारात कांद्याचा किमान भाव 500 रुपये प्रति क्विंटल, कमाल भाव 2600 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 1300 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला.

पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळ कांद्याला कमाल व सरासरी 2601 रुपये प्रतिक्विंटल तर सरासरी 1400 रुपये प्रतिक्विंटल भाव जाहीर झाला आहे.

Maharashtra Onion Rate
Maharashtra Onion Rate

Leave a Comment

Close Visit Mhshetkari