Maharashtra Rain ब्रेकिंग : महाराष्ट्रात उद्यापासून जोरदार पावसाला सुरुवात होणार !

Maharashtra Rain

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी एक मोठी बातमी येत आहे. पण ही बातमी शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची आणि खूप आनंदाची असेल. कोकणातील काही भाग वगळता राज्यात सुमारे 13 ते 14 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे.

Maharashtra Rainत्यामुळे शेतकरी चिंतेत असून खरीप हंगामातील पिके काढणीच्या टप्प्यावर आली आहेत. आता पाऊस पडला नाही तर खरिपातील पिके पूर्णपणे हातातून जातील, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. गेल्या महिन्यात राज्यात मुसळधार पाऊस झाला होता पण चालू महिन्यात राज्यात कुठेही मुसळधार पाऊस नाही.

 एसटी प्रवासासाठी खुशखबर, हे कार्ड असेल तर करता येणार मोफत प्रवास.

त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन कधी होणार आणि पुन्हा मुसळधार पाऊस कधी सुरू होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. आता महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचा मोठा दावा हवामान खात्याने केला आहे.

विशेष म्हणजे, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उद्यापासूनच राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. उद्यापासून राज्यात पावसाला सुरुवात झाली, तर खरीप हंगामातील पिकांना यामुळे नवसंजीवनी मिळेल, अशी आशा आहे.

टीप:- ज्या शेतकऱ्यांनी 2020 आणि 2022 यावर्षी सोयाबीनचा विमा भरला होता अशाच शेतकऱ्यांना हे पैसे मिळत असल्यामुळे इतर शेतकरी बांधवांनी गैरसमज करून घेऊ नये.. Crop Insurance 2022

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हवामान खात्याने एक आनंदाची बातमी दिली असून महाराष्ट्रातील कोकण आणि विदर्भात उद्यापासून पुढील चार दिवस पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे. उद्यापासून पुढील चार दिवस विदर्भात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असेही आयएमडीने आपल्या निवेदनात नमूद केले आहे.

कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडेल?

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर आयएमडीने या संबंधित जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

तसेच कोकणच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

निश्‍चितच, उद्यापासून पुढील चार दिवस विदर्भ आणि कोकणातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असल्याने आता शेतकऱ्यांची भीती कमी होणार आहे. तसेच, हा अंदाज खरा ठरल्यास खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळेल.

Leave a Comment

Close Visit Mhshetkari