monsoon update : पंजाबराव डख म्हणाले, राज्यात येत्या 24 तासात पडणार या जिल्ह्यात धो धो पाऊस.
monsoon update अखेर राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याची माहिती सुप्रसिद्ध हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी दिली आहे. अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारलेल्या राज्याच्या विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाळ्यात पहिल्यांदाच पाऊस पडेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
दुबार पेरणीचे संकट टळल्याने शेतकरी सुखावला आहे. गेल्या २४ तासांत राज्यातील अनेक भागात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. कोकण मध्य महाराष्ट्रातील काही नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत असल्याने धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने काही भागात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात केल्या आहेत.
रू.1100 मध्ये नाही,आता सिलिंडर फक्त रू.690 मध्ये घरी येईल, संपूर्ण प्रक्रिया
पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात 18 जुलैपासून पावसाचा जोर वाढला आहे. राज्यात पुढील तीन दिवस 19 जुलै ते 21 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे. हे तीन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. राज्यात 30 जुलैपर्यंत कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज सुप्रसिद्ध हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
कापूस पिकावर या तणनाशकांची फवारणी करा, तण नियंत्रणाची खात्री, तणनाशकांची नावे पहा आणि किती आणि कशी फवारणी करावी?
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच काही तज्ज्ञ आणि हवामान संस्थांनी राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल, असा अंदाज वर्तवला होता. या वर्षीही एल निनोचा प्रभाव राज्यातील वातावरणावर कायम राहणार असून त्यामुळे राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र यावर्षी 2023 मध्ये राज्यात दुष्काळ नसून सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.
