Onion Rate Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्यात कांद्याचे भाव कडाडले…! ‘या’ बाजारात कांदा पोहचला 3 हजाराच्या घरात, वाचा सविस्तर
उर्वरित अनुदान व कर्जमाफी 15 ऑगस्ट पूर्वी मिळणार असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे..
त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. मात्र आता गेल्या जुलैपासून कांद्याची बाजारपेठ तेजीत आहे. राज्यातील जवळपास सर्वच प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी 1,000 ते 1,500 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळतो.
राहुरी वांबोरी, नेवासा घोडेगाव, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल, सोमवारी अर्थातच 31 जुलै 2023 रोजी लिलावात कांद्याला चांगला विक्रमी भाव मिळाला आहे.
PM Kisan 14th Installment : हप्त्याचा एसएमएस मिळाला नाही? येथे त्वरित करा तक्रार, मिळतील 2 हजार रुपये
अहमदनगरमध्ये काय भाव मिळतोय? नेवासा घोडेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव आवारात काल ४१ हजार ८५१ क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. त्यात कांद्याला किमान 300 रुपये प्रति क्विंटल, कमाल 2500 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 1400 रुपये प्रति क्विंटल दर नमूद करण्यात आला आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत काल उन्हाळ कांद्याची 6 हजार 250 क्विंटल आवक झाली. कालच्या लिलावात कांद्याला किमान 200 रुपये प्रति क्विंटल, कमाल भाव 2301 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 1250 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.
राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात काल कमाल भाव दोन हजार रुपये प्रतिक्विंटलपेक्षा कमी होता. कालच्या लिलावात या बाजारात 9 हजार 30 क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. कालच्या लिलावात कांद्याचा किमान भाव 100 रुपये प्रति क्विंटल, कमाल भाव 1800 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी भाव 1100 रुपये प्रतिक्विंटल होता.