Onion Rate :खुशखबर….! अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ बाजारात कांद्याला मिळाला सर्वोच्च भाव, पहा….
Onion Rate : राज्यात गेल्या २५ ते ३० दिवसांपासून कांद्याला समाधानकारक दर मिळत आहे. त्यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रत्यक्षात मान्सूनचे उशिरा आगमन आणि सुरुवातीच्या टप्प्यात कमकुवत मान्सून यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता.
शेतकऱ्यांना मिळणार 50 टक्के अनुदानावर फवारणी पंप, इथे करा ऑनलाइन अर्ज
विशेष म्हणजे गेल्या महिन्याभरापर्यंत कांद्यालाही अपेक्षित भाव मिळत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र या महिन्याच्या सुरुवातीपासूनच कांद्याला चांगला समाधानकारक भाव मिळू लागल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात सरासरी 1 हजार 200 ते 1 हजार 500 पर्यंत भाव आहे. काही बाजारात यापेक्षा जास्त भाव मिळत आहे. विशेष म्हणजे अनेक बाजारपेठेत कमाल बाजारभाव 2500 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला आहे. काही बाजारपेठेत कांद्याला कमाल दोन हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.
महिलांना मिळणार पिठाची गिरणी; “या” 23 जिल्ह्यासाठी नवीन अर्ज सुरू,असा करा अर्ज
काल अर्थातच 30 जुलै 2023 रोजी झालेल्या लिलावात अहमदनगर जिल्ह्यातील राहता कृषी उत्पन्न बाजार समितीतही कांद्याला चांगला भाव मिळाला आहे. राहता एपीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, काल कांद्याचा कमाल भाव २२०० रुपये प्रतिक्विंटल होता.
या एपीएमसीमध्ये काल १५ हजार ४१८ गोण्या कांद्याची आवक झाली. यामध्ये क्रमांक 1 च्या कांद्याला 1700 ते 2200 रुपये, 2 नंबरच्या कांद्याला 950 ते 1650 रुपये, नंबर 3 ला 400 ते 900 रुपये तर गोलटी कांद्याला 900 ते 1300 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. जोडलेल्या कांद्यासाठी.