Ration Card: तुमच्या नावे किती रेशन मिळते याचा मेसेज आता मोबाईलवर मिळणार आहे. यासाठी राशन कार्ड धारकांनी आपला मोबाईल क्रमांक स्वस्त धान्य दुकानदाराला द्यावा लागणार आहे. त्यानंतर राशन दुकानाकडे रेशन आल्याचा एसएमएस मोबाईल क्रमांकावर प्राप्त होईल. यामुळे धान्याचा काळाबाजार होण्यावर आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राशन आल्याचा एसएमएस सुविधा आपल्याला सुरू करण्यासाठी लाभार्थ्यांनी आपला मोबाईल क्रमांक ई पोस मशीन मध्ये अंगठ्याचा ठसा देऊन अपडेट करून घ्यावा.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राशन चा लाभ घेत असलेल्या राशन कार्ड (Ration Card) धारकांनी नजीकच्या राशन दुकानावर जाऊन मोबाईल नंबर देणे गरजेचे आहे. त्यासाठी इ केवायसी करणे बंधनकारक आहे
कोणत्या Ration Card कार्डधारकांना किती धान्य मिळते?
अंतोदय: या कार्ड धारकाला योजनेमध्ये नाव समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला गहू 15 किलो तर तांदूळ 20 किलो दिले जाते.
प्राधान्य: प्राधान्य कुटुंब योजनेमधील काढ धारकाला प्रति लाभार्थी दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ दिले जाते.
शेतकरी: शेतकरी अर्थात एपीएल कार्डधारक शिधापत्रिका धारकांना आता धन्य ऐवजी रोख रक्कम दिली जाणार आहे.
राशन दुकानावर धान्य आलेले चा मेसेज केवळ 25 लोकांना मिळू शकेल. गावातील सरपंच, उपसरपंच यासारख्या पदाधिकाऱ्यांना धान्य मिळाल्याचा मेसेज आल्यावर ते पुढे गावात देऊ शकतील. मेसेज मिळवण्यासाठी इ केवायसी करणे आवश्यक आहे.