Talathi News : तलाठी भरतीचा “अर्ज” केला असेल तर हे नक्की पहाच…..

Talathi News : तलाठी भरतीचा “अर्ज” केला असेल तर हे नक्की पहाच…..

Talathi News : यंदा तलाठी भरतीसाठी 10 लाखांवर अर्ज आले आहेत. राज्याच्या तलाठी भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे समोर येत आहेत. 2019 ला झालेल्या तलाठी भरतीमध्ये अनेक आरोपींना पकडण्यात आले आहे. त्यामुळे आता होणाऱ्या तलाठी भरतीमध्ये घोटाळे रोखण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने काही उपाययोजना करण्यात आल्या आहे. आपण जर तलाठी भरतीसाठी अर्ज केला असेल तर ही बातमी नक्कीच वाचा.

यावेळी परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीची सोय राहणारच आहे. मात्र, उमेदवारांची तपासणी करण्यासाठी विशेष यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. काही उमेदवार आधुनिक यंत्रांचा वापर करून गैरप्रकार करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता उमेदवारांची परीक्षा केंद्राच्या बाहेर आणि नंतर केंद्रामध्ये प्रवेश झाल्यावरही तपासणी होणार आहे. उमेदवार आपल्या जागेवर बसला की त्याची पुन्हा एकदा तपासणी होणार आहे.

 

येथे पहा अर्ज करण्यासाठी या तारखेपर्यंत मुदतवाढ

 

तसेच कुठल्याही उमेदवारावर जर संशय असेल त्याच्यावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. आणि त्याचा संपूर्ण चित्रीकरण केले जाणार आहे. त्यामुळे या परीक्षेमध्ये जाणाऱ्या उमेदवारांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रावर जाताना कुठलेही तांत्रिक उपकरण सोबत ठेऊ नका, हाताला घड्याळ बांधू नका याशिवाय अनेक नियम पाळावे लागणार आहेत. Talathi News

Leave a Comment

Close Visit Mhshetkari